मराठा आरक्षण: वकिलांची फौज तयार, आरक्षण न्यायालयात टिकवणारच - चंद्रकांत पाटील

Foto

औरंगाबाद- राज्याचे महसूल आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. सरकारकडून देखील तज्ञ वकिलांची मोठी फौज तयार असून, आरक्षण न्यायालयात टिकवणारच असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्र्यांच्या १ डिसेंबरला आरक्षण जाहीर करू या आश्वासनावर विश्वास न ठेवता राज्यभरामध्ये मराठा आंदोलकांनी विविध उपक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून सगळ्या जिल्ह्यांमध्ये संवाद यात्रा सुरू करण्यात आलेली असताना, दुसरीकडे मराठा ठोक मोर्चा मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार आहे. यावर मोर्चे, उपोषणे करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.